logo
  • May 4, 2017
  • Comments Off on आवर्तठेव योजना (R/D)

आवर्तठेव योजना (R/D)

१) संचितठेव योजना

सर्व सभासदांसाठी १२ ते ३६ महिने कालावधीपर्यंत मासिक हप्त्यांच्या स्वरुपात गुंतवणुक करण्याचा पर्याय असलेली हि योजना आहे. सभासद यामध्ये दरमहा ५००/- व त्यापुढे १००/- चे पटीत रक्कम गुंतवू शकतात.

अ ) १२ महिने मुदतीसाठी ७.२५  टक्के एवढा आकर्षक व्याजदर असून कमीतकमी रु. ५००/-  दरमहा गुंतवणुक केल्यास १२ महिन्यांंनंंतर  रु. ६000 वर रु. ६२३९ /- एवढी परतावा रक्कम मिळते.

ब ) २४ महिने मुदतीसाठी ७.५०  टक्के एवढा आकर्षक व्याजदर असून कमीतकमी रु. ५००/- प्रमाणे दरमहा गुंतवणूक केल्यास २४ महिन्यांनंतर रु. १२,०००/- वर रु. १२,९४३/- एवढी परतावा रक्कम मिळते.

क ) ३६ महिने मुदतीसाठी ७.५० टक्के एवढा आकर्षक व्याजदर असून कमीतकमी रु. ५०० /- प्रमाणे दरमहा गुंतवणूक केल्यास ३६ महिन्यानंतर रु. १८,०००/- वर रु. २०,१४७ /- एवढी परतावा रक्कम मिळते.

योजनेची वैशिष्टे :

१  ) जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा. (कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक )

2)  राजलक्ष्मी ठेव योजना

सर्व सभासदांसाठी ३६ महिने कालावधीसाठी मासिक हप्त्यांच्या स्वरूपात गुंतवणूक करण्याचा पर्याय असलेली हि योजना आहे. सभासद यामध्ये दरमहा ५००/- व त्यापुढे १००/- चे पटीत रक्कम गुंतवू शकतात .

या योजनेचा कालावधी ३६ महिने असून व्याजदर ८.००  टक्के एवढा सर्वाधिक ठेवण्यात आलेला आहे.

योजनेची वैशिष्टे :

१ ) जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा. ( कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा १ टक्के अधिक )

३) महालक्ष्मी लखपतीठेव योजना :

सर्व सभासदांंसाठी ३६ व ६० महिने कालावधीसाठी मासिक हप्त्यांच्या स्वरुपात गुंतवणुक करण्याचा पर्याय असलेली व लाखात परतावा देणारी ही  योजना आहे.

अ) या योजनेमध्ये ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये परतावा रक्कम हवी असल्यास रु. २४७० /- चा मासिक हप्ता भरून सभासद या योजनेची लाभ घेऊ शकतात. ३६ महिने कालावधीनंतर व्याजासह रु. १,००,३१०/- एवढी परतावा रक्कम सभासदांना मिळते.

ब) या योजनेमध्ये ६० महिन्यांच्या कालावधीमध्ये परतावा रक्कम हवी असल्यास रु. १३८०/- चा मासिक हप्ता भरून सभासद या  योजनेचा लाभ घेऊ शकतात. ६० महिने कालावधीनंतर व्याजासह रु. १,००,५८५/- एवढी परतावा रक्कम सभासदांना मिळते.

योजनेची वैशिष्टे :

१ ) जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा (कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा १ टक्के अधिक )


Comments are closed.