सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्या. कुडाळ जि. सिंधुदूर्ग हि संस्था दिनांक १/११/१९८६ रोजी नोंदविण्यात आली. दि. १४/०८/२०११ चे वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे नाव सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदूर्गनगरी असे करण्याबाबत ठराव करण्यात आलेला होता त्यास मा. जिल्हा उपनिबंधक यांनी २२/०९/२०११ रोजीच्या पत्राने उपविधी दुरूस्तीस मान्यता दिलेली आहे.
♦ सभासद कल्याण फंड योजनेअंतर्गत दिवंगत सभासदांचे काही प्रमाणात कर्जमाफ.
♦ शिक्षक मदतनिधी योजनेतून दुर्धर आजार उपचारासाठी रु. 5000/- पर्यंत आर्थिक सहाय्य.
♦ व्यक्तीगत पगाराच्या पटीत रु.१२ लाखा पर्यंत प्रकारानुसार कर्ज मिळण्याची सुविधा.
♦ संगणकीकृत कामकाज व तत्पर सेवा.
♦ सभासदाना एस् एम् एस् द्वारे खात्यावरील व्यवहाराचा संदेश देणारी एकमेव पतपेढी.
♦ जिल्हयातील खा.प./माध्यमिक/उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालये यामधील सर्व कर्मचारी वर्गाची एकमेव अग्रणी पतपेढी.
♦ पतपेढी स्थापनेपासून अ ऑडीट वर्ग प्राप्त करणारी पतपेढी.
♦ जीवन सुरक्षा ठेवद्वारे दिवंगत सभासदांचे रू १ लाखकर्ज माफ करणारी पतपेढी. कर्ज नसल्यास वारसास रू. ५०,०००/- चे आर्थिक सहाय्य दिले जाते.
♦ सातत्याने १५ टक्के लाभांश देणारी पतपेढी.
♦ कर्जमुक्ती निधी द्वारे दिवंगत सभासदांचे जमा कर्जमुक्ती निधीच्या प्रमाणात रू. ५ पाच लाख कर्ज माफ करणारी पतपेढी. कर्ज नसल्यास जमा कर्जमुक्ती निधीच्या प्रमाणात वारसास रू. ५ लाख पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
♦ लवकरच एन.ई.एफ.टी / आर.टी.जी.एस. सुविधा कार्यान्वीत.