logo
  • May 4, 2017
  • Comments Off on आवर्तठेव योजना (R/D)

आवर्तठेव योजना (R/D)

१) संचितठेव योजना

 

सर्व सभासदांसाठी १२ ते ३६ महिने कालावधीपर्यंत मासिक हप्त्यांच्या स्वरुपात गुंतवणुक करण्याचा पर्याय असलेली हि योजना आहे. सभासद यामध्ये दरमहा रु. १०० किंवा १०० चे पटीत रक्कम गुंतवू शकतात.

 

अ ) १२ महिने मुदतीसाठी ८.७५ टक्के एवढा आकर्षक व्याजदर असून कमीतकमी रु. १००/- प्रमाणे दरमहा गुंतवणुक केल्यास १२ महिन्यांंनंंतर  रु. १२०० वर रु. १२५८ /- एवढी परतावा रक्कम मिळते.

 

ब ) २४ महिने मुदतीसाठी ९.०० टक्के एवढा आकर्षक व्याजदर असून कमीतकमी रु. १००/- प्रमाणे दरमहा गुंतवणूक केल्यास २४ महिन्यांनंतर रु. २४००/- वर रु. २६३८/- एवढी परतावा रक्कम मिळते.

 

क ) ३६ महिने मुदतीसाठी ९.०० टक्के एवढा आकर्षक व्याजदर असून कमीतकमी रु. १०० /- प्रमाणे दरमहा गुंतवणूक केल्यास ३६ महिन्यानंतर रु. ३६००/- वर रु. ४१४६/- एवढी परतावा रक्कम मिळते.

 

योजनेची वैशिष्टे :

१) ५८ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी ०.२५ टक्के अधिक व्याजदर

२ ) जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा. (कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक )

 

2)  राजलक्ष्मी ठेव योजना

 

सर्व सभासदांसाठी ३६ महिने कालावधीसाठी मासिक हप्त्यांच्या स्वरूपात गुंतवणूक करण्याचा पर्याय असलेली हि योजना आहे. सभासद यामध्ये दरमहा रु. १०० किंवा १०० चे पटीत रक्कम गुंतवू शकतात .

या योजनेचा कालावधी ३६ महिने असून व्याजद ९.२५ टक्के एवढा सर्वाधिक ठेवण्यात आलेला आहे.

योजनेची वैशिष्टे :

१) ५८ वर्षावरील जेष्ठ नागरीकांंसाठी ०.२० टक्के अधिक व्याजदर

२) जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा. ( कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक )

 

३) महालक्ष्मी लखपतीठेव योजना :

 

सर्व सभासदांंसाठी ३६ व ६० महिने कालावधीसाठी मासिक हप्त्यांच्या स्वरुपात गुंतवणुक करण्याचा पर्याय असलेली व लाखात परतावा देणारी ही  योजना आहे.

 

अ) या योजनेमध्ये ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये परतावा रक्कम हवी असल्यास रु. २४३० /- चा मासिक हप्ता भरून सभासद या योजनेची लाभ घेऊ शकतात. ३६ महिने कालावधीनंतर व्याजासह रु. १,००,३३१/- एवढी परतावा रक्कम सभासदांना मिळते.

 

ब) या योजनेमध्ये ६० महिन्यांच्या कालावधीमध्ये परतावा रक्कम हवी असल्यास रु. १३४०/- चा मासिक हप्ता भरून सभासद या  योजनेचा लाभ घेऊ शकतात. ६० महिने कालावधीनंतर व्याजासह रु. १,००,३०२/- एवढी परतावा रक्कम सभासदांना मिळते.

 

योजनेची वैशिष्टे :

१) ५८ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी ०.२५ टक्के अधिक व्याजदर

२) जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा (कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक )


Comments are closed.