logo
  • August 8, 2016
  • Comments Off on इतिहास

इतिहास

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग असे दोन जिल्हे दि. ०१/०५/१९८१ पासून अस्तित्वात आल्याने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्या. रत्नागिरी नोंदणी क्र. आर.टी.जी./बी.एन.के./१०१/सन १९६४ दि. २५/०३/१९६४ या संस्थेचे विभाजन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १७ (१) या कार्यालयाचे उपरोक्त नमूद आदेशान्वये होऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढी मर्या. कुडाळ जि. सिंधुदुर्ग अशा दोन स्वतंत्र संस्था अस्तित्वात आल्याने भूतपूर्व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढी मर्या. रत्नागिरी या संस्थेची नोंदणी रद्द करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये आदेश देऊन सदरची नोंदणी ०१/११/१९८६ पासून रद्द  करीत आहे असा आदेश मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांनी दि. ०१/११/१९८६ रोजी दिला.

त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १७(१) सी. व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १६ अन्वये रत्नागिरी जिल्ह्यासाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढी मर्या. कुडाळ जि. सिंधुदूर्ग अशा दोन नव्या संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० (महाराष्ट्र अधिनियम क्र.-२४-१९६१) चे कलम ९ अन्वये नोंदविण्यात आल्या आहेत असे मानण्यात येईल.

विद्यमान रत्नागिरी जिल्हा माध्यामिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्या. रत्नागिरीच्या ३०/०६/१९८४ च्या अखेरीस असलेल्या मालमत्ता व दायित्व यांची विभागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढी मर्या. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यामध्ये खालिल तत्वावर करण्यात आली.

♦  संस्थेचे भागभांडवल – प्रत्यक्ष सभासदाने धारण केलेल्या भागाचे रकमेप्रमाणे रत्नागिरी ५७.८० सिंधुदूर्ग ४२.२०

♦  संस्थेचे निधी – भागभांडवलाचे प्रमाणात रत्नागिरी ५७.८० सिंधुदुर्ग ४२.२०

♦  ठेवी –  प्रत्यक्ष यादीप्रमाणे विभाजनोत्तर जिल्ह्राचे भौगोलिक क्षेत्राप्रमाणे

♦  इतर सर्व जायदादी –  भागभांडवलाचे प्रमाणात रत्नागिरी ५७.८० सिंधुदुर्ग ४२.२०

♦  सभासद कर्ज    –  प्रत्यक्ष यादीप्रमाणे विभाजनोत्तर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्राप्रमाणे

 


Comments are closed.