logo
  • May 4, 2017
  • Comments Off on उत्सव कर्ज

उत्सव कर्ज

उत्सव कर्ज

उत्सव कर्ज  हे खालील मुख्य सणांंनाच देण्यात येत

१) गुढीपाडवा      २) बुध्दपोर्णिमा      ३) गणेश चतुर्थी        ४) दसरा         ५) दिवाळी     ६ ) बकरी ईद     ७) रमजान ईद      ८) नाताळ

व्याजदर :  .९.२५%

परतफेडीचा कालावधी : 

  • इ. एम्. आय. पध्दतीने :

जास्तीत जास्त १० मासिक हप्ते किंवा सेवानिवृत्ती तारखेच्या  ६ महिने अगोदरच्या तारखेपर्यंतचे शिल्लक कालावधीतील हप्ते

जास्तीत जास्त कर्ज मर्यादा : रु. १०,००० /-

आवश्यक कागदपत्रे :

१) विहीत नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज

२) मुख्याध्यापकांंच्या सही शिक्क्यासह पगाराचा दाखला

अटी व शर्ती :

१) कर्जदाराने कर्जमागणी अर्ज संपूर्ण व एकाच रंगाच्या शाईने कोणतीही खाडाखोड न करता तसेच व्हाईटनरचा वापर न करता भरलेला असावा.

२) पगाराच्या दाखल्यावर खाडाखोड झाल्यास त्या ठिकाणी मुख्याध्यापक यांची सही आवश्यक आहे किंवा शाळेच्या लेटरहेडवर स्वतंंत्र पगारदाखला अर्जासोबत जोडलेला असला पाहिजे.

३) कर्जमागणी अर्जावर पगाराचा दाखल्याच्या ठिकाणी मुख्याध्यापकांची सही आवश्यक आहे.

४) कर्जदाराने कर्जमागणी अर्जावर केलेली सही पतपेढीकडे असलेल्या सहीच्या नमुन्याशी जुळती असावी.

५) उत्सव कर्जासाठी एक साक्षीदार आवश्यक असून साक्षीदार आपल्या प्रशालेतीलच घेण्यात यावा व साक्षीदाराच्या सह्या पुर्ण करूनच अर्ज सादर करण्यात यावा .

६) पुर्ण भरलेला व पात्र अर्ज कर्ज देण्यास योग्य राहील.

७) कर्जमागणी अर्ज डाऊनलोड करताना लिगल पेपरवर प्रिंट केलेलाच अर्ज ग्राह्य मानला जाईल.

अर्ज :
अर्ज डाऊन लोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (कृपया प्रिंट लिगल कागद वर घ्या )
उत्सव कर्जाकरीता अर्ज


Comments are closed.