logo
  • August 8, 2016
  • Comments Off on आमच्या विषयी

आमच्या विषयी

इमारत:

 संस्थेची इमारत प्रशस्त व स्वमालकीची असून तिचे बांधकाम १७/०३/१९९९ ला सुरू झाले व दि. ३१/०५/२००० रोजी इमारत बांधून पूर्ण झाली. या भव्य इमारतीचे उद्घाटन रविवार दि. ०८/१०/२००० रोजी मा. श्री. बाबासाहेब कुपेकर, सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. वसंतराव खोब्रागडे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे होते.

संस्थेची ही इमारत तीन मजली असून तळमजल्यावर बहुउद्देशीय हॉल, पहिल्या मजल्यावर संस्थेचे कार्यालय व दुस­या मजल्यावर अतिथी निवास कक्ष तसेच संचालक सभा कक्ष आहे. या इमारतीचा एकूण परीसर ८७५ स्क्वे.मी. असून तळमजला २७० स्क्वे.मी., पहिला मजला २७०स्क्वे.मी., दुसरा मजला ११६ स्क्वे.मी. आहे.

संगणकीकरण:

संस्थेचे कार्यालय पुर्णत: संगणतीकृत आहे. सभासदाना जलद सुविधा देता यावी, कामकाजात निटनेटकेपणा यावा यासाठी संस्थेने सन २००६ सालापासून संगणीकरण केले आहे. तसेच सभासदाला त्याचे खात्यावर झालेल्या व्यवहाराची माहिती त्वरीत मिळावी यासाठी एस्.एम्.एस्. बँकींग प्रणाली दि.०१/०४/२००९ पासून सुरू करण्यात आली. त्यामुळे सभासदास त्याचे खात्यावर झालेल्या व्यवहाराची माहिती त्वरीत लघुसंदेशाद्वारे भ्रमणध्वनीवर प्राप्त होते. याद्वारे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणून सभासदांची विश्वासाहार्यता जपण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.

समाजाभिमुख कामकाज :

संस्थेतर्फे दरवर्षी विविध विज्ञान प्रदर्शन तसेच शाळांच्या उपक्रमास जाहिरात रूपात देणगी देऊऩ शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी अल्पसा हातभार लावला जातो. शैक्षणिक उपक्रमांचा प्राधान्याने विचार करून योग्य तेवढे सहकार्य देऊन शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जातो.

तसेच विविध ठिकाणाहून भेटीसाठी तसेच कार्यपद्धतीची माहीती घेण्यासाठी आलेल्या विविध संस्थांच्या पदाधिका­-याना कामकाजा विषयी माहिती दिली जाते तसेच मार्गदर्शनही केले जाते.

विशेष कार्य :

या संस्थेचे २५ वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष दि. ०१/११/२०१० ते ३१/१०/२०११ या कालावधीत साजरे करण्यात आले. याचा शुभारंभ दि. ०१/११/२०१० रोजी करण्यात आला.

रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पतपेढीच्या सर्व सभासदांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच प्रथम तालुकास्तरावर गटवार वक्तृत्व स्पर्धा सहकार या विषयावर घेण्यात आली. प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांकाना पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त विद्याथ्र्यांची जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात आली. यातून विद्यार्थ्यांच्या मनात सहकार रूजावा तसेच त्यांना सहकाराची माहिती व्हावी, अंगी असलेल्या कलागुणांना कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून ही स्पर्धा घेण्यात आली.

त्याचप्रमाणे १५ ऑक्टोबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९ ठेवीदार सन्मानीत वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. तसेच सभासद संपर्क अभियान राबवण्यात आले.


Comments are closed.