logo
  • May 3, 2017
  • Comments Off on जामिनतारण कर्ज

जामिनतारण कर्ज

जामिनतारण कर्ज 

व्याजदर : ११.००%

परतफेडीचा कालावधी :

  • इ.एम्.आय. पध्दतीने :

जास्तीत जास्त १७५ मासिक हप्ते किंंवा सेवानिवृत्ती तारखेच्या  ६ महिने अगोदरच्या तारखेपर्यतचे शिल्लक कालावधीतील हप्ते

  • मुद्दल अधिक व्याज पध्दतीने :

कर्जाच्या प्रमाणात जेवढा बसेल त्याप्रमाणे

जास्तीत जास्त कर्ज मर्यादा : रू. १२ लाखापर्यंत (जामिनतारण , आकस्मिक, उत्सव व संगणक कर्ज मिळून )

आवश्यक कागदपत्रे :

१) विहीत नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज

२) २ सक्षम जामिनदार

३) मुख्याध्यापकांंच्या सही शिक्क्यासह पगाराचा दाखला

अटी व शर्ती :

१) कर्जदाराने कर्जमागणी अर्ज संपूर्ण व एकच रंगाच्या शाईने कोणतीही खाडाखोड न करता तसेच व्हाईटनरचा वापर न करता भरलेला असावा.

२) पगाराच्या दाखल्यावर खाडाखोड झाल्यास त्या ठिकाणी मुख्याध्यापक यांची सही आवश्यक आहे किंवा शाळेच्या लेटरहेडवर स्वतंत्र पगारदाखला अर्जासोबत जोडलेला असला पाहिजे.

३) कर्जमागणी अर्जावर पगाराचा दाखला, कर्जदार जामिनदार यांची सही आवश्यक आहे किंवा मुख्याध्यापकांची सही आवश्यक आहे.

४) कर्जदाराने कर्जमागणी अर्जावर केलेली सही पतपेढीकडे असलेल्या सहीच्या नमुन्याशी जुळती असावी.

५) जामिनदारांच्या सह्या पतपेढीकडे असलेल्या सहीच्या नमुन्याशी जुळत्या असाव्यात.

६) जामिनदार अन्य शाळेतील घेतल्यास कर्जदार जामिनदार यांची माहिती व दोन्ही करारपत्रांवर संंबंधीत अन्य शाळेच्या मुख्याध्यापकांची सही आवश्यक आहे.

७) कर्जमागणी अर्जावर घरबांधणी, घरदुरुस्ती, फ्लॅट / सदनिका खरेदी, घराचे वाढीव बांधकाम ही कारणे नमुद करून आयकरासाठी व्याजाची सवलत मिळण्यासाठी पतपेढीकडील दाखला आवश्यक असल्यास कर्जमागणी अर्जासोबत संबंधीत कामाशी निगडीत कागदपत्रे देणे आवश्यक आहे.

८) जामिनतारण कर्जासाठी दोन साक्षीदार आवश्यक असून ते आपल्या प्रशालेतीलच घेण्यात यावेत व साक्षिदारांच्या सह्या पुर्ण करुनच अर्ज सादर करण्यात यावा.

९) जामिनदार यांनी आपण ज्याच्या कर्जासाठी जामिन राहत आहोत तो कर्जदार कर्ज परतफेडीस सक्षम असल्याची खात्री करुनच जामिनदार म्हणून सही करावयाची आहे.

१०) कर्जाबाबत दुरध्वनीवरून माहिती घेतना आपल्याला मिळणारा एकूण पगार व हाती मिळणा-या पगाराची खात्रीशीर माहीती पतपेढीस देणे आवश्यक आहे.

११) पुर्ण भरलेला व पात्र अर्ज कर्ज देण्यास योग्य राहील.
अर्ज :
अर्ज डाऊन लोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (कृपया प्रिंट लिगल कागद वर घ्या )
सर्वसाधारण (जामिन तारण) कर्जाकरीता अर्ज


Comments are closed.