logo
  • December 27, 2017
  • Comments Off on स्वप्नपुर्ती कर्ज योजना

स्वप्नपुर्ती कर्ज योजना

दि. ०१/०१/२०१८ पासून सभासदांसाठी खास कमी व्याजदराची कर्ज योजना सुरु केली असून या सुवर्णसंधीचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा असे  आवाहन मा. संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे. सदर कर्ज योजनेची वैशिष्टे व अटी खालीलप्रमाणे आहेत.

दि.१६/१२/२०२० पासून कर्जयोजने मध्ये बदल करण्यात आला असून कर्ज मर्यादा रू ४ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच दि. ०१/०१/२०२१ पासून व्याजदर ९.५० टक्के एवढा करण्यात आलेला आहे.

वैशिष्टे :

१) स्वप्नपुर्ती कर्ज योजनेचा व्याजदर फक्त ९.५० टक्के (दि. ०१/०१/२०२१ पासून)

२) कर्जाची रक्कम थेट सभासदाच्या खात्यात जमा

३) रु. ४.०० लाख मर्यादेपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी

 

परतफेडीचा  कालावधी :

इ.एम.आय.पध्दतीने :

जास्तीत जास्त १२० मासिक हप्ते

जास्तीत जास्त कर्ज मर्यादा : ४,००,०००/- पर्यंत

आवश्यक कागदपत्रे :

  • विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज

अटी :

१) संस्थेच्या www.sindhumadhyamikpatpedhi.org संकेतस्थळावर दिलेल्या विहीत नमुन्यातच कर्ज मागणी अर्ज सादर करावा लागेल.

२) कर्ज मागणी अर्ज एकाच हस्ताक्षरात व एकाच शाईने तसेच संपुर्ण भरलेला असावा.

३) कर्जमागणी अर्जावर खाडाखोड तसेच व्हाईटनरचा वापर करु नये.

४) कर्जदाराने कर्जमागणी अर्जावर केलेली सही पतपेढीकडे असलेल्या सहीच्या नमुन्याशी जुळती असावी

५) स्वप्नपुर्ती कर्जासाठी एक जामिनदार  व एक साक्षीदार आवश्यक आहे.

६) पुर्ण भरलेला व पात्र  अर्ज कर्ज देण्यास योग्य राहील

७) कर्जमागणी अर्ज डाऊनलोड करताना लिगल पेपरवर प्रिंट केलेलाच अर्ज ग्राह्य मानला जाईल.

 

अर्ज : 

अर्ज डाऊन लोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (कृपया प्रिंट लिगल कागद वर घ्या )
स्वप्नपुर्ती कर्ज योजना अर्ज


Comments are closed.